Uncategorized

आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकञ;त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही.

विजय शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले आहेत, शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर भाष्य केले.दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याबाबत सुप्रिया सुळे निर्णय घेतील असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राज्यात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.

एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना आता दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केले आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी टाकलेल्या गुगलीमुळे राज्यातील राजकारणात भूंकप होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

शरद पवार म्हणाले, ‘भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवावे. मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो आहे. आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकञ आहेत. आमचे दिल्लीतले खासदारही एकाच विचाराने बांघले गेलेले आहेत. राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं मतदारसंघातली विकासकामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे. पण याबाबतचा निर्णय हा मी देणार नाही त्यांचा तो एकञ बसून घ्यावा. एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावे. पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेलं सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एकचं आहे. त्यामुळे भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही.

माझे सगळे खासदार एक मताचे आहेत, आमदारामध्ये अस्वस्थता असू शकते. मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे. पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा.

संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही हा निर्णय सुप्रियाने घ्यावा. इंडियन एक्स्प्रेसच्या मुलाखतीत शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सुप्रिया सुळे याचे काय या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. पक्षात दोन प्रवाह, एकाला वाटते अजितसोबत जावे. दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे या मताचा आहे, असेही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये खासदार शरद पवार यांच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरुन दोन्ही नेते न्यायालयातही गेले आहेत. लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button