Uncategorized

काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीमंत ढोले यांची प्रचारात आघाडी.

काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीमंत ढोले तर भारतीय जनता पक्षाकडून माजी सभापती विलासराव वाघमोडे मैदानात उतरले आहे. या गटातील मतदार विकासाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेणारे असून भावनांना बळी न पडता काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीमंत ढोले यांनी व्यक्त केला आहे.

नागरिकांना कायम मदतीचा हात, गावोगावी निर्माण झालेली भक्कम ताकद, तसेच शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदान यामुळे ढोले यांना प्रचंड जनसमर्थन मिळत आहे.तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले विलासराव वाघमोडे यांच्या उमेदवारीने या गटात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.

या निवडणुकीत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आप्पासाहेब जगदाळे यांचा दांडगा जनसंपर्कही ढोले यांच्या पाठीशी उभा असून याचा थेट फायदा राष्ट्रवादीला होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button