Uncategorized

भाटनिमगाव ग्रामस्थ एकवटले; राष्ट्रवादीच्या पंचायत समिती उमेदवार अर्चना खबाले यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार.

विजय शिंदे

पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समितीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (२१) भाटनिमगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच अर्चना अजित खबाले या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वडापुरी गणासाठी अर्ज दाखल केला आहे.

अर्ज दाखल करण्यापूर्वी खबाले यांनी गावातील सर्व देवतांचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामदैवत पीरसाहेब यांच्या दर्ग्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

भाटनिमगाव गावाला स्वर्गीय रमेशकाका शुक्ल यांच्यानंतर प्रथमच पंचायत समिती साठी संधी मिळणार आहे, यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने अर्चना खबाले यांना पाठिंबा दिला असून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार यशराज जगदाळे यांनाही मोठे मताधिक्य देण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले.

अर्चना खबाले यांनी गेली पाच वर्षे भाटनिमगाव ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून काम केले आहे त्यांचे पती अजित खबाले हे परिसरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असतात.

या वेळी भाटनिमगाव व परिसरातील नागरिकांनी गावातील चौकातून मोटर सायकल व चार चाकी वाहनांची रॅली काढत अर्ज दाखल केला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button