Uncategorized
शहा गावात ज्ञानाचा नवा प्रकाश; पेपर वाचनालयाचा शुभारंभ,सरपंच दिलीप पाटील यांच्या माध्यमातून उपक्रमाची सुरुवात.

विजय शिंदे
शहा गावामध्ये कै. यशोदाबाई गणपतराव पाटील यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ पेपर वाचनालयाची सुरुवात करण्यात आली आहे. शहा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच दिलीप पाटील यांच्या माध्यमातून या उपक्रमाची औपचारिक सुरुवात झाली.
या वाचनालयामुळे आता शहा गावातील नागरिकांना दररोज विविध वर्तमानपत्रांचे वाचन करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
शहा गावातील शंभू महादेव मंदिरासमोर वाचनालयाची स्थापना करण्यात आली असून, या शुभारंभ कार्यक्रमाला गावातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, गावाच्या प्रगतीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.



