Uncategorized

वडापुरी माळवाडी गटातून राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल मारकड इच्छुक.

इंदापूर: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे बिगुल लवकरच वाजणार असून इंदापूर तालुक्यात सर्वच गट व गणात उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष नेतृत्वाकडे फिल्डिंग लावली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य पै विशाल मारकड हे वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गट व सौभाग्यवतींसाठी माळवाडी गणात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून पडस्थळ परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात मारकड हे अग्रेसर होते.पडस्थळ भागात कुस्ती स्पर्धा,खुल्या डान्स स्पर्धा, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम मारकड यांनी राबवले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीसाठी पक्ष नेतृत्व आपल्या नावाचा विचार करेल असा ठाम विश्वास विशाल मारकड यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button