Uncategorized

वडापुरी माळवाडी गटातून पांडुरंग (तात्या) मारकड इच्छुक.!!

विजय शिंदे

इंदापूर नगर परिषद निकालानंतर तालुक्यातील राजकीय पक्षांकडून मिशन जिल्हा परिषद व पंचायत समिती सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष या प्रमुख पक्षांचे इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून मोठंमोठे कार्यक्रम घेत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

उजनी धरण परिसरातील कार्यक्षेत्र असलेल्या वडापुरी माळवाडी या जिल्हा परिषद गटात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहेत.

पांडुरंग मारकड यांचे परिसरात सामाजिक कार्य असून सर्व समाजाला बरोबर घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती ही त्यांची जमेची बाजू आहे. यापूर्वी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची दोन वेळा पंचवार्षिक निवडणुका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल कडून लढवली आहे.

इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून पांडुरंग मारकड यांनी काम केले आहे. राजकीय कामांचा अनुभव असलेले मारकड हे परिसरात होणाऱ्या सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. युवकांचे संघटन ही त्यांची जमेची बाजू आहे. नव्याने तयार झालेल्या वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गटात मारकड यांना उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा त्यांचे समर्थक कार्यकर्ते करत आहेत.

यासंदर्भात पांडुरंग मारकड यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले गेली अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ काम केले आहे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी संवाद असून गटातील जनतेशी चांगला संपर्क आहे. यावेळी होणारी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button