बाभुळगाव येथील पंकज यादव यांची सैन्य दलात निवड.

विजय शिंदे
भारतीय सैन्यदलात अग्निपथ योजनेतून बाभूळगाव (ता. इंदापूर) येथील पंकज भारत यादव यांची निवड झाल्याने बाभुळगाव ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी पंकज यांची मिरवणूक काढत सत्कार केला. लहानपणापासूनच भारतीय सैन्य दलात दाखल होण्याची पंकज यांची इच्छा होती, पहिल्याच प्रयत्नात वयाच्या १९ व्या वर्षी भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने गावातील युवकांनी फटाक्याची आतशबाजी करत गुलालाची उधळण केली.
पंकज यांचे प्राथमिक शिक्षण बाभूळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले, माध्यमिक शिक्षण गावातील कमल विद्यालय येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण हे कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे झाले.
यावेळी बोलताना पंकज यादव म्हणाले सैन्य दलात दाखल होण्याची इच्छा लहानपणापासूनच होती, यासाठी आई-वडील, चुलते, आजी, आजोबा व संपूर्ण कुटुंबियांनी मला साथ दिली. माझ्या निवडीनंतर ग्रामस्थांनी माझे कौतुक केले. यापुढे देश सेवा करणार असल्याने माझ्या कुटुंबीयांना व गावांला माझा अभिमान वाटेल असे काम करील. माझे वडील भारत यादव यांनी बाभूळगाव चे पाच वर्ष सरपंच म्हणून काम केले आहे, चुलते महावीर यादव हे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, यादव कुटुंबियांना गावची सेवा करण्याची संधी मिळाली आता देशाची सेवा करण्याची सधी मिळाली याचा अभिमान आहे.
ग्रामपंचायत बाभूळगाव, श्री अमोलराजे इंगळे मित्रपरिवार, श्री बंडु जाधव मित्रपरिवार व इतरही संघटना पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी यादव यांच्या सत्काराचे आयोजन केले होते.



