Uncategorized

शहा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्ग खोल्या बांधकामासाठी ४२लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर.

विजय शिंदे

शाळा (तीन वर्ग खोल्या) बांधकामासाठी ४२ लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून हा विकास निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सरपंच दिलीप पाटील यांनी दिली.

गेली अनेक वर्षापासून शहा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील इमारत नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते, यासाठी सरपंच दिलीप पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे वर्ग खोल्या बांधकामासाठी निधी मिळावा या मागणीसाठी पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आले असून वर्गखोल्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button