Uncategorized

श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या “लेका”साठी, बाप बुलंद कहाणी!!

विजय शिंदे.

माजी नगरसेवक सुनील अरगडे आणि त्यांचा मुलगा सागर अरगडे या बाप लेका ची कहाणी इंदापूर नगर परिषदेच्या राजकीय इतिहासात नक्कीच सोनेरी पानावर लिहिली जाईल.

Oplus_16908288

इंदापूर नगर परिषदेचे माजी स्वीकृत नगरसेवक सुनील अरगडे यांनी इंदापूर नगर परिषदेच्या २००२,२०१२,२०१७ अशा तीन पंचवार्षिक निवडणुका लढवल्या परंतु पराभवाने त्यांची पाठ सोडली नाही. जनतेतून नगरसेवक होण्याचे अरगडे यांचे स्वप्न मात्र स्वप्नच राहणार अशी चर्चा इंदापूर शहरात सुरू होती, अरगडे म्हणजे पडण्यासाठी उभा असणारा, पडणारा उमेदवार अशी चर्चा नेहमीच राजकीय विरोधक करत असत परंतु त्यांचे जनतेतून नगरसेवक होण्याचे स्वप्न मात्र त्यांचा मुलगा सागर अरगडे यांनी पूर्ण केले.

नुकत्याच झालेल्या इंदापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वतःचा प्रभाग सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक आठ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेतून सागर अरगडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना नेहमीच साथ देणाऱ्या या प्रभागातून अरगडे यांनी मोठे मताधिक्य घेतले असून नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा यांनाही चांगले मतदान या प्रभागात झाले आहे.

गेली अनेक वर्ष इंदापूर शहराच्या राजकारणात संघर्षमय जीवन जगणाऱ्या बापाच्या व लेकाच्या प्रेमाची दास्तान या निवडणुकीत अनुभवायला मिळाली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच मुलाने बापाला खांद्यावर उचलून घेत आनंद उत्सव साजरा केला, बापाची स्वप्नपूर्ती झाली लेक जनतेतून नगरसेवक झाला अशा आशयाचे मजकूर सोशल मीडियावर टाकत सागर यांनी आनंद साजरा केला. लेकासाठी लढलेला बाप,आणि श्रमलेल्या बापाच्या पाठीशी खंबीर उभा राहिलेला लेक यांची कहाणी इंदापूर शहराच्या राजकारणात कायम ठळकपणे जाणवेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button