Uncategorized
नगरपालिका ही माझी वयक्तिक मालमत्ता नाही; भरत शहा यांनी विरोधकांच्या आरोपाचे केले खंडन.

विजय शिंदे
इंदापूर नगरपरिषद ही प्रशासकीय नियमानुसार व नगरपंचायत कायद्यानूसार चालते. व्याज व दंडाची तरतुद १९६५ च्या याची कायद्यामध्ये आहे.भले आज कोणी म्हणत असेल की आमच्याकडे लावली नाही,
आत्ताच लागली यामागेही काही वेगवेगळी कारण आहेत.२०१५ ला नगरपरिषदेचे संगणकीकरण झाले.आणी संपुर्ण डाटा आॅनलाईन झाला व तो गव्हर्मेंटला जोडला.त्यावेळी गव्हर्मेंटने या गोष्टितील त्रुटी काढुन त्या त्रुटी असलेल्या गोष्टिवर कारवाई करते.त्यावेळी कायद्याने नगरपरिषद चालविण्यासाठी मजबुर असते.त्यामुळे नगरपालिका ही माझी वयक्तिक मालमत्ता नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा यांनी इंदापूर खडकपुरा येथील प्रचार सभेत बोलताना केले.
ते पुढे बोलताना म्हणाले की,आज व्याजदर माफीचा प्रस्ताव इंदापूर नगरपरिषदेने काढलेला आहे.कोणी सांगते की ही नगरपालिका कोणाच्यातरी सांगण्यावरून प्रस्ताव शासन दरबारी पाठवत नाही,जाणिवपुर्वक अडवणुक केली जात आहे.परंतु मी सांगतो की, प्रस्ताव अडवून आमच्या कुटुंबाची अडवणुक करणार्यातील मी नाही.आणि मी कुटुंबाचे नूकसान करणार्यातील नाही.तर भरत शहा हे एक कुटुंब आहे आणि आम्ही जे काही केले आहे ते लोकांना सांगण्याची गरज असल्याचे वाटत नाही.व्याज आणि शास्ती शंभर टक्के माफीचा इंदापूर नगरपरिषदेचा प्रस्ताव हा महाराष्ट्रातुन सर्वात अगोदर गेलेला आहे.परंतु काहींजण खोट बोल पण रेटून बोल असा आव आणून आमच्यावर खोटे नाटे आरोप करत असुन शहरातील जनता या निवडणुकीत खोटे बोलणार्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नसल्याचे भरत शहा म्हणाले.यावेळी इंदापूर शहरातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
याप्रसंगी कृषि मंत्री दत्तात्रय भरणे,इजिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे,माजी नगरान्यक्ष अशोक इजगुडे, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव मुकुंद शहा, भारत शिंदे, स्वप्निल राऊत, प्रशांत सिताप,गौरव राऊत, शुभम पवार इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
————————————————————



