इंदापूरच्या शहा ग्लोबल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
विजय शिंदे
शाह ग्लोबल स्कूलमध्ये शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि सक्रियतेने साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात योग दिनाचे महत्त्व विशद करत करण्यात आली.
यावेळी विद्यालयाच्या शिक्षिका विद्या कराडे यांनी योगाच्या गरजेबद्दल व त्याच्या लाभांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.योग हा केवळ व्यायाम नसून, स्वतःशी, निसर्गाशी आणि समाजाशी एकरूपता साधण्याचा मार्ग असल्याचं काराडे यांनी सांगितले.यानंतर विद्या कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर केली. विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.
विशेषतः इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मीरा व आरुषी यांनी सूर्यनमस्कार सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.कार्यक्रमाचा समारोप संस्कृत श्लोकांच्या पठणाने करण्यात आला. एकंदरीत कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि योगासना विषयीची जाणीव अधिक दृढ झाली.



