इंदापूर पंचायत समितीला विभाग स्तरीय राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये द्वितीय क्रमांक.

विजय शिंदे
इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पंचायत समितीने घरकुल आवास योजनेमध्ये उत्तम कामगिरी केली असून इंदापूर पंचायत समितीला विभाग स्तरीय राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी सचिन खुडे व आवास योजने संदर्भातील कर्मचारी यांना गौरविण्यात आले आहे.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत फुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी सचिन खुडे म्हणाले इंदापूर पंचायत समितीमध्ये गरीब गरजू व सर्व समाजातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल आवास योजनेमार्फत लाभ मिळाला असून यासाठी इंदापूर पंचायत समिती मधील सर्व कर्मचारी ग्रामपंचायतचे अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शासन स्तरावर आपल्या पंचायत समितीचा गौरव होणे ही अभिमानास्पद असून यापुढेही पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी पंचायत समितीतील सर्व अधिकारी कर्मचारी कटिबद्ध आहेत.
गटविकास अधिकारी सचिन खुडे हे कार्यक्षम अधिकारी असून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यामध्ये त्यांचे बारीक लक्ष असते. आवास योजनेत दुसरा क्रमांक मिळवल्याबद्दल पंचायत समितीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



