शिवाजी सार्वजनिक वाचनालय आयोजित गौरी सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर; धोत्रे व जगताप विभागून प्रथम.
विजय शिंदे
श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय भाटनिमगाव यांच्या वतीने इंदापूर तालुक्यात महिलांच्या कलागुणांना स्वतंत्र एक व्यासपीठ तयार करून देण्यासाठी उत्सव काळात गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचा निकाल मंगळवारी (दि. ०२) रोजी जाहीर झालेला असून विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष विजय शिंदे म्हणाले तालुक्यातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते, तालुक्यातील महिलांनी या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला सर्वच महिलांनी गौरी सजावट चांगल्या पद्धतीने केली होती. यामधून सामाजिक समतेचाही संदेश देण्यात आला.
इंदापूर तालुका गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेतील विजेते-
प्रथम क्रमांक
वनिता दिगंबर धोत्रे (अंबिका नगर इंदापूर) व संध्या आजिनाथ जगताप (भांडगाव).
द्वितीय क्रमांक
प्रियंका विलास वाघमारे (गलांडवाडी नंबर १) व पूजा शुभम कदम (भाटनिमगाव).
तृतीय क्रमांक:
संध्या अभिजीत जाधव(दत्तनगर इंदापूर) स्वाती ओंकार मगर (भाटनिमगाव)अंजली राजेंद्र गलांडे (गलांडवाडी नंबर १) ज्योती देविदास फलपले, विजया सोमनाथ पिंपरे (गलांडवाडी २)
उत्तेजनार्थ बक्षीस
स्वप्नाली अमर गायकवाड(इंदापूर) प्रियंका रावसाहेब गवळी(डिकसळ) शितल किरण शिंदे, वर्षा प्रमोद गवळी, माधुरी समाधान भोसले(भाटनिमगाव) सुप्रिया मारकड (पडस्थळ)कीर्ती जगताप (भांडगाव)संगीता शिंदे (अवसरी)साधना राजू कांबळे,उज्वला जयवंत मगर(भाटनिमगाव), श्रावणी शिंदे (अवसरी)
या स्पर्धेत विशेष प्राविण्य म्हणून पल्लवी मनोहर भोसले यांना गौरविण्यात आले.स्पर्धेचे निरीक्षक म्हणून सुमित्रा चव्हाण, विद्या सर्जेराव यांनी काम पाहिले.



