भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा कार्यकारणी जाहीर; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा प्रवीण माने यांच्या हस्ते सत्कार.
विजय शिंदे
भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा दक्षिण कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्या कार्यकारणीमध्ये इंदापूर तालुक्यातील आकाश कांबळे यांची भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस तर गजानन वाकसे यांची ओबीसी मोर्चा अध्यक्ष पुणे जिल्हा, शिवाजीराव निंबाळकर हे जिल्हाउपाध्यक्ष, नानासाहेब शेंडे यांना जिल्हा चिटणीस पद, तसेच प्रवीणकुमार शहा यांना पुणे जिल्हा व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीचे नेते व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रविण माने यांनी सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र’ मोदी व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसीत भारताची व भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
नव्याने करण्यात आलेल्या या निवडीमुळे भविष्यात पक्षाची ताकद आणखी वाढणार असून, सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर आमच्या पक्षाशी जोडला जाणार असल्याची भावना यावेळी प्रविण माने यांनी व्यक्त केली.
यावेळी इंदापूर शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किरण गानबोटे, मयूर शिंदे व इतर सहकारी उपस्थित होते.



