Uncategorized

शेतकरी कर्जमाफी करण्याची हीच योग्य वेळ; आ जयंत पाटील.

विजय शिंदे

सीना नदीच्या महापुरामुळे माढा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. तर दसरा- दिवाळी सण तोंडावर आहे.यामुळे सरकारने दसऱ्यापूर्वी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता तातडीने द्यावा; अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे.

यावेळी राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी सांगतात, की योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ. आता शेतकरी कर्जमाफी करण्याची हीच योग्य वेळ आहे. कर्जमाफी संदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी. याशिवाय शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यासाठी बँकांना तातडीने आदेश द्यावेत; अशी मागणी ही आमदार जयंत पाटील यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button