Uncategorized

इंदापुरात भाजप “स्व”बळावर.!!

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजणार आहे, पक्षाने आदेश दिल्यास इंदापुरात भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असून प्रत्येकाने झाडून कामाला लागण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी चे युवा नेते प्रविण माने यांनी कार्यकर्त्यांना केले.

इंदापूर शहरात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रवीण माने बोलत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा’ निर्णयाची घोषणा केली त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झाली आहे या बद्दल माहिती सर्वसामान्यांना माहिती व्हावी या हेतूने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत बोलत असताना, प्रविण माने यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी मरगळ झटकून तयार राहण्याचे आवाहन केले. लवकरच जिल्हा परिषद निवडणूका, पंचायत समिती, नगर परिषद याशिवाय पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची रणधुमाळी उडणार असल्याचे सूतोवाच माने यांनी दिले.

यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष शेखर वढणे म्हणाले पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या तालुक्यातील प्रत्येक पदवीधरापर्यंत कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांनी पोहोचायचे असून, पक्षाची ध्येयधोरणा व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कशाप्रकारे सहयोग देऊ शकतो हे प्रत्येक मतदाराला समजावून सांगणे गरजेचे आहे.

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन निवडणुकीची तयारी करायची आहे. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रकाचे वितरण जिल्हाध्यक्ष वढणे व माने यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मयूरसिंह पाटील, माऊली चवरे, मारुती वणवे, सदानंद शिरदाळे, आकाश कांबळे,गजानन वाकसे, नानासाहेब शेंडे, प्रविणकुमार शहा, तानाजी थोरात, बाळासाहेब पानसरे, सचिन आरडे, माऊली वाघमोडे, भारतीय जनता पार्टी मंडलचे अध्यक्ष राम आसबे, तेजस देवकाते, राजकुमार जठार, शहरचे अध्यक्ष किरण गाणबोटे, संतोष चव्हाण, विजय घोगरे, अभिजीत घोगरे, अमोल मुळे, मयुर शिंदे, शितल साबळे, माधुरी भराटे, प्रमिला राखुंडे, सुजाता कुलकर्णी, योगिता यादव व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button