Uncategorized

रोटरी क्लब ऑफ इंदापूर कडून अवसरी येथील श्री हनुमान विद्यालयातील इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना मिळालं आयडियल स्टडी ॲप.

विजय शिंदे

रोटरी क्लब ऑफ इंदापूर कडून अवसरी मधील येथील हनुमान विद्यालयातील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ऍप चे मोफत वितरण रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप (दादा) गारटकर तसेच रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे संस्थापक उपाध्यक्ष मुकुंद (शेठ) शहा यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ इंदापूर चे अध्यक्ष नितीनशेठ शहा, भीमाशंकर जाधव, धरमचंद लोढा, प्रमोद भंडारी, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

एका स्टडी ऍप ची किंमत पंधराशे रुपये इतकी असून हे ॲप रोटरी क्लब इंदापूर कडून श्री हनुमान विद्यालय अवसरी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आले आहे.यावेळी नितीन शहा यांनी विद्यार्थ्याना या ऍप बद्दल माहिती व वापराबद्दल तांत्रिक सूचना दिल्या.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण लोंढे सर यांनी रोटरी क्लब ऑफ इंदापूर च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नानासाहेब घळके सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button