Uncategorized

इंदापूर पोलीस दलातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर..!मलईदार टेबल की अधिकाऱ्यांचा मानसिक त्रास.? वरिष्ठ करणार का तपास.?

विजय शिंदे

पुणे ग्रामीण पोलीस दलात एक खळबळजनक घटना घडली असून पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारणे इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाले आहेत…

या पूर्वी २०२२ साली ही विष्णू केमदारणे यांच्या पत्नीने त्यांचे मिसिंग दाखल केली होती. या घटनेने इंदापूर तालुक्यात चर्चेला उधाण आले असून मलईदार टेबल की अधिकाऱ्यांचा मानसिक त्रास.? यावर चर्चा सुरू झाली आहे.

केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून, या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत.

मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून धमकावत आहेत. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून धमकी दिली आहे असं या चिठ्ठीत लिहिलेल आहे.

विष्णू केमदारणे यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ देखील पाठवलेला आहे आणि माझ्या या अवस्थेला होणाऱ्या परिणामांना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हेच जबाबदार आहेत असंही या चिठ्ठीमध्ये लिहिण्यात आलं आहे.

या संपूर्ण खळबळजनक घटनेनंतर इंदापूर पोलीस ठाण्यात विष्णू केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी आपले पती हरवल्याची तक्रार देखील दाखल केली असून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सवाल उपस्थित केला आहे. खात्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या पतीला वैयक्तिक धमकी का देताय, माझ्या पतीला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा मी माझ्या मुलाबाळांसह इंदापूर पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करेल असा इशारा ही दिला आहे.

केमदारणे यांच्या पत्नीने पोलिसात या बाबत तक्रार दिली असून, पोलीस केमदारणे यांचा तपास करण्यासाठी पथक पाठवले असून केमदारणे यांनी केलेल्या आरोपा संदर्भात चौकशी करून कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया बारामती विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुदर्शन राठोड यांनी दिली आहे.

यापूर्वीही विष्णू केमदारणे मिसिंग दाखल.

यापूर्वीही विष्णू केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका यांनी १३—९—२०२२ रोजी विष्णू केमदारणे हे राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेले आहेत ते अद्याप घरी आले नाहीत अशी मिसिंग रजिस्ट्री दाखल केली होती.

त्यामुळे यापूर्वीही अशाच प्रकारे विष्णू केमदारणे हे घर सोडून निघून गेले असल्याचे स्पष्ट होत आहे.

इंदापूर पोलीस दलातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर.?

या घटनेने पुणे ग्रामीण दलातील इंदापूर पोलीस ठाण्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. यामागे आपल्याला मलईदार टेबल मिळावा यासाठी तर हा वाद नाही ना .? अशी चर्चा बाहेर सुरू आहे.

या घटनेचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास करून काही तो सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी आता सर्व सामान्य जनतेतून होत आहे. या घटनेचा योग्य तपास झाल्यास अनेक अर्थपूर्ण संबंध, पैशांची केलेली मागणी बाहेर येण्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button