Uncategorized

काटी — वडापुरी जिल्हा परिषद गट; कोविड काळातील पुण्याई कामी येणार.?

गेल्या काही वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याची चर्चा आहे. तसे झाल्यास इंदापूर तालुक्यातील काटी वडापुरी जिल्हा परिषद गटात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समितीच्या निवडणुका २०१७ च्या गट गण रचनेनुसार झाल्यास काटी वडापुरी या जिल्हा परिषद गटात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.काटी वडापुरी हा जिल्हा परिषद गट गेली दोन पंचवार्षिक सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण आहे. ह्या वेळेस हा गट ओबीसी साठी राखीव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास वडापुरी गण व काठी गणात मात्र सर्वसाधारण उमेदवारांसाठी जोरदार फील्डिंग लागण्याची शक्यता आहे.

यावेळेस काही करून पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद गाठायची ही खून गाठ सर्वपक्षीय इच्छुकांनी बांधली आहे. निवडणुका लांबल्याने अभि नहीं तो कभी नही या भूमिकेत इच्छुक आल्याचे दिसून येत आहे.गट गण रचना व आरक्षण सोडती नंतर उमेदवारी संदर्भात अधिक स्पष्टता येणार असल्याने इच्छुक मात्र छुप्या पद्धतीने तयारी करत आहेत.

काठी वडापुरी हा जिल्हा परिषद गट माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु २०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजीत तांबिले व सतीश पांढरे यांनी विजयी मिळवत पाटील यांच्या गडाला सुरुंग लावला. नंतर २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या गटातून मोठे मताधिक्य घेत पुन्हा वर्चस मिळवले होते परंतु २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व राज्याचे क्रीडा अल्पसंख्यांक युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या गटातून काठावरचे मताधिक्य मिळवले.

काटी वडापुरी हा गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही जिंकण्यासाठी सोपा असेल मात्र ज्या उमेदवाराला संधी मिळेल त्यांना स्वतःची ताकत पणाला लावावी लागेल.तसेच विधानसभेची निवडणूक लढवलेले अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांची ही भूमिका या गटात महत्वपूर्ण ठरणार आहे.

काटी वडापुरी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी राष्ट्रवादीकडून शशिकांत तरंगे, सतीश पांढरे, अतुल झगडे,अभिजीत तांबिले, विष्णू पाटील,रवींद्र सरडे, हेमंत पाटील, सिताराम जानकर, दिलीप पाटील, मनोहर भोसले, सतीश चित्राव, विठ्ठल महाडिक, सोमनाथ जावळे, हनुमंत जमदाडे, भागवत काटकर, नामदेव तोबरे, गोकुळ कोकरे इच्छुक आहेत.

तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अतुल वाघमोडे, गोपीचंद गलांडे, अमोल चंदनशिवे, महेश शिर्के, मोहन खबाले, राजकुमार जाधव, रमेश देवकर, अजित खबाले, विजयमामा शिद, प्रफुल चव्हाण, अमोल इंगळे, दादा तोबरे, प्रीतम देवकर आदी नावांची चर्चा आहे.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांच्या पत्नी राणी मोहिते या अनुसूचित जाती या प्रवर्गातून जिल्हा परिषद किंवा काटी पंचायत समिती गणासाठी इच्छुक आहेत.

काटी वडापुरी जिल्हा परिषद गटात पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांच्या विचाराचा उमेदवार जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती साठी असेल तर त्याचा निश्चितच फायदा राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे.

कोविड काळातील पुण्याई कोणाला .?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (corona second wave) कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना इंदापूर तालुक्यातील युवा नेत्यांनी कौतूकास्पद काम केलं आहे.ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी खूप मदत केली आहे. बाहेरगावाहून आलेल्या गावातील नागरिकांना अन्नधान्य किट, त्यांच्या प्रवासाची सोय, परिसरात रक्तदान शिबिरे, विविध उपक्रमांचे आयोजन करून नेतागिरी सोडून जनतेच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या या नेत्यांबद्दल जनमानसात ही आदर आहे.त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोरोना काळातील पुण्याई कोणाला लाभणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button