Uncategorized

ओबीसींच्या प्रश्नाबाबत उपसमितीची स्थापना;उपसमितीच्‍या अध्‍यक्षपदी बावनकुळे तर सदस्य पदी भुजबळ, मुंडे, भरणे यांचाही समावेश.

विजय शिंदे

मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. यानंतर आज (दि. ३) राज्‍य मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसी समाजासाठीही महत्त्वाचा निर्णय घेण्‍यात आला.

ओबीसींच्या प्रश्नाबाबत एका उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. ओबीसींच्या प्रश्नाबाबत उपसमितीमध्‍ये सहा मंत्री असतील. ही उपसमिती ओबीसी समाजच्‍या प्रश्‍नांसंदर्भात ही उपाययोजना सुचवण्याचे काम करणार आहे.

उपसमितीच्‍या अध्‍यक्षपदी बावनकुळे

ओबीसींच्या प्रश्नाबाबत एका उपसमितीची स्थापना करण्‍या निर्णय आज राज्‍य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्‍यात आला.ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीच्‍या अध्‍यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे असतील. तर छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे असे सदस्य असतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीमध्‍ये भाजपचे 4, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 सदस्‍य अहेत. ही उपसमिती ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम, योजनांबाबत ही समिती कामकाज करणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button