Uncategorized

इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा.

विजय शिंदे

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाच्या काही मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटसंदर्भात शासनाकडून अध्यादेशही काढण्यात आला आहे. या निर्णयाचा इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी फटाक्यांची आतीषबाजी तसेच विजय रॅली व अभिनंदनसभा पार पडली. मराठा समाज राज्या मध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे व त्या भावाची आरक्षणाची मागणी सरकारने मंजूर केल्या बाबत इतर समाजातील समाज बांधवानी आनंद व्यक्त केला.

पळसदेव येथून मुंबईला आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पळसदेव मधील नागरिक मोठया प्रमाणात गेले होते. मुंबई येथील आंदोलनातील बांधावाना कोरडा सिधा व इतर तरकारी पदार्थ पाठवले त्या वेळी मराठा समाजातील नागरिक व इतर समाजातील नागरिक उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button