Uncategorized

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने इंदापूर येथे मोफत आरोग्य शिबिर तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन.

विजय शिंदे

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने इंदापूर येथे छत्रपती संभाजी महाराज युथ फाऊंडेशन यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिर तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने इंदापूर येथे दिनांक १२ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता ग्रामदैवत इंद्रेश्वर मंदिर नजीक इंद्रेश्वर चौक पांद्यारा येथे राकेश पिंजन सरकार पुणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच मूर्ती पूजन व भव्य मिरवणूक सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले आहे.

१३ मे रोजी छत्रपती संभाजी युथ फाऊंडेशन ,इंदापूर क्रिटीकेअर सेंटर,शिवसेना वैद्यकीय कक्ष, बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये ECG तपासणी, साखरेची तपासणी, रक्तदाब तपासणी, नेत्र तपासणी, अल्प दरात चष्मे, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन, हाडांची तपासणी, मनका तपासणी, गुडघे तपासणी इत्यादी सेवांचा समावेश करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button