Uncategorized

इंदापूर येथे शेतकऱ्यांना युरिया खताचा तुटवडा.

विजय शिंदे

मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसानंतर आता पेरणीला सुरुवात होत असतानाच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खताचा तुटवडा भासत आहे.

इंदापूर तालुक्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी कडवळ मका, तसेच इतरही बागायती क्षेत्र वाढणार असल्याचे चित्र असून, पिकासाठी युरियाची मागणी वाढल्याने तुटवडा भासत आहे.

इंदापूर तालुक्यातील अनेक कृषी केंद्रांवर सध्या युरिया खत मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. मुळात खतांच्या मुख्य वितरण केंद्रांवरच युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याने कृषी सेवा केंद्रांनाही खत मिळत नाही. परिणामी खरेदीसाठी बाजारात आलेल्या शेतकऱ्यांनाही खतांविना परतावे लागत आहे. सध्या युरियाचा खत उपलब्ध नसल्याचे कृषी सेवा केंद्रचालकांकडूनही सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button