शहा– महादेवनगर ग्रामपंचायत च्या सरपंच पदी दिलीप पाटील बिनविरोध.!!
विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील शहा—महादेवनगर ग्रामपंचायत च्या सरपंच पदी दिलीप वामनराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.शहा ग्रामपंचायत कार्यालयात आज बुधवार दि २५ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी दिलीप पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी औदुंबर शिंदे यांनी दिलीप पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी तलाठी देशमुख, ग्रामसेवक चेडगे मॅडम व ग्रामपंचायतचे सर्व सत्ताधारी सदस्य उपस्थित होते.
शहा — महादेवनगर ग्रामपंचायत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे, मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायत मध्ये कारभार केला जातो.
सरपंच स्वाती पांढरे यांनी मुदतपूर्व राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती, या ठिकाणी आज सरपंच पदाची निवड करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले होते. निवडीनंतर दिलीप पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला, गेली अनेक वर्षापासून शहा गावात पाटील कुटुंब यांचे वर्चस्व आहे.मागील ग्रामपंचायत निवडणुकीत पंचायत समितीचे सदस्य सतीश पांढरे व माजी सरपंच विष्णू पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने वर्चस्व मिळवले होते.
सर्वांना सोबत घेऊन काम करू..
यावेळी दिलीप पाटील यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य, पॅनल प्रमुख, गावातील सर्व वरिष्ठ नेते मार्गदर्शक, ग्रामस्थ यांचे आभार मानले. यापुढे मंत्री दत्तात्रय भरणे, व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर मामा भरणे यांच्या नेतृत्वाखाली गावातील विकास कामे मार्गी लागतील असे मत व्यक्त केले, सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे ते म्हणाले.



