Uncategorized
जगदाळे व खबाले शेतकऱ्यांच्या बांधावर..

विजय शिंदे
वडापुरी माळवाडी जिल्हा परिषद गट व वडापुरी पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार यशराज जगदाळे व पंचायत समिती उमेदवार अर्चना खबाले यांच्या प्रचारासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते डोअर टू डोअर प्रचारात सहभागी झाले आहेत.
थेट मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी जगदाळे व खबाले यांनी आघाडी घेतली असून गावागावात वाडी वस्तीवर जाऊन ते नागरिकांशी संपर्क करत आहेत.पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण तसेच युवकांच्या रोजगाराच्या संधी हे मुद्दे गावभेटीदरम्यान प्राधान्याने मांडण्यात येत आहे.
या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन ते करत आहेत.



