भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ वडापुरी– माळवाडी जिल्हा परिषद गटात घोंगडी बैठकांचे आयोजन.
विजय शिंदे
पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी वडापुरी माळवाडी गट व गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती, भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे नेते प्रवीण माने यांच्या प्रमुख उपस्थितीत घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
वडापुरी माळवाडी गटातून जिल्हा परिषदेसाठी सतीश पांढरे तसेच वडापुरी पंचायत समिती साठी शारदा देशमुख, माळवाडी पंचायत समिती साठी वैशाली मारकड उमेदवार आहेत.
यावेळी कालठण २ शिरसोडी,आजोती, पिंपरी, माळवाडी१_२ सरडेवाडी, शहा, कांदलगाव, हिंगणगाव, बाभूळगाव, गलांडवाडी २,बेडसिंग,भाटनिमगाव या गावात प्रदीप गारटकर व प्रवीण माने एकत्रित घोंगडी बैठक घेणार आहेत.
यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ नेते प्रदीप गारटकर व प्रवीण माने म्हणाले वडापुरी माळवाडी या जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाच्या तीनही उमेदवारांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. घोंगडी बैठकांच्या माध्यमातून गट व गणातील वाडीवस्ती व गावातील कार्यकर्ते व मतदारांना भारतीय जनता पक्षाला मतदान करून विकासाच्या प्रवाहात सामील होण्याचे आवाहन करण्यासाठी येणार आहे.



