Uncategorized

इंदापूर येथे “आर्थिक समावेशन योजनांकरिता विशेष मोहीम” यशस्वीरित्या पार

विजय शिंदे


युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा इंदापूर यांच्या सौजन्याने दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी “आर्थिक समावेशन योजनांकरिता विशेष मोहीम” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन गुरुकृपा सांस्कृतिक भवन, दत्तनगर रोड, इंदापूर येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमात अटल पेन्शन योजना, अपघाती विमा योजना, कर्ज योजना, डिजिटल फसवणूक प्रतिबंध, बँक व्यवहार, शेती कर्ज योजना तसेच नमो ड्रोन दीदी, लखपती दीदी, पीएमएफएमई योजना, युनियन सेल्फ हेल्प ग्रुप (CC व टर्म लोन) याविषयी माहिती देण्यात आली आणि नावनोंदणीही करण्यात आली.

कार्यक्रमासाठी महाप्रबंधक श्री. विपिन शुक्ला (पुणे विभाग), क्षेत्रीय प्रमुख श्री. मयंक भारद्वाज (पुणे मेट्रो), आणि गटविकास अधिकारी श्री. सचिन खुडे (पं.स. इंदापूर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सूत्रसंचालन युनियन बँकेचे उपक्षेत्रीय प्रमुख श्री. श्रीपाद भालवणकर यांनी केले.

तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. विजयकुमार बोडके (कृषी विभाग) यांनी महाराष्ट्र शासनाच्या कृषी योजनांची माहिती दिली, तर श्री. कैलास दळवी (क्षेत्रीय कार्यालय, पुणे मेट्रो) यांनी वित्तीय समावेशनाच्या योजना समजावून सांगितल्या.

या कार्यक्रमात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत श्री. रोहन देवकर आणि किशोर सरडे यांना विमा सर्टिफिकेट वाटप करण्यात आले, तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत लता काटे व नागनाथ निकम यांना सर्टिफिकेट वितरित करण्यात आले.

पोल्ट्री उद्योगासाठी अमोल सरडे यांना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले.कार्यक्रमाची सांगता शाखा प्रमुख श्री. जयपाल तोरणे यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.

या कार्यक्रमासाठी तालुक्यातील युनियन बँकेचे नामांकित ग्राहक –अंकुश दुके, रुशांत सरक, जे. के. शिंदे, दयानंद व्यवहारे, स्वप्नील राऊत, बापू गदादे, अनिल राऊत, राहुल शिंदे, सत्यवान साळुंखे, पंकज चौधरी, पंकज करे, चंद्रकांत करे, राजेंद्र भिसे – यांनी उपस्थिती नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमास सुमारे ५०० नागरिकांची उपस्थिती होती, ज्यात महिलांचा लक्षणीय सहभाग उल्लेखनीय ठरला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामीण विकास अधिकारी अशोक भिसे, तुषार भगत, श्रीकृष्ण सोळंके, तुषार निकम, पूजा काळे, ऋषिकेश गोमे, अशोक शिंदे आणि गणेश जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button