Uncategorized

प्रदीप गारटकर यांचा भाजप प्रवेश निश्चित.!! “या” तारखेला करणार भाजपमध्ये प्रवेश.

विजय शिंदे

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पक्षवाढीचे आक्रमक धोरण राबवत राजकीय हालचालींना वेग दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत बंडखोरी करत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे) शिवसेना (एकनाथ शिंदे) राष्ट्रीय समाज पक्ष व इतरही संघटना यांची सर्वपक्षीय मोट बांधत कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत शहा व प्रदीप गारटकर यांच्यात अटीतटीच्या झालेल्या लढतीत गारटकर यांचा १२७ मताने पराभव झाला.

राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर प्रदीप गारटकर काय भूमिका घेणार.? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते, गारटकर हे मूळचे संघ विचाराचे, पतीत पावन संघटना, भारतीय जनता पक्ष,शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत. २००६ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. १९ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी संघटनेतील पदांवर काम केले, नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत स्थानिक नेत्यांशी त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी सर्वपक्षीय कृष्णा भीमा विकास आघाडी स्थापन करून निवडणूक लढवली होती. गारटकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी विनंती भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण माने यांनी इंदापुरातील एका कार्यक्रमात केली होती. त्यानंतर आता प्रदीप गारटकर यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असल्याचे खात्रीलायक माहिती मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय सहकार व नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, आ राहुल कुल,माजी आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, युवा नेते प्रवीण माने यांच्या उपस्थितीत प्रदीप गारटकर हे १० जानेवारी रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.

आगामी काळात इंदापूर तालुक्यात होणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवत भाजपने नियोजनबद्ध मोर्चेबांधणी सुरू केली आहे.प्रदीप गारटकर यांच्या भाजप प्रवेशाने पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील नाराज कार्यकर्ते भाजप पक्षाच्या गळाला लागू शकतात.

प्रदीप गारटकर यांच्याबरोबर इंदापूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य, सरपंच इतरही पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचे चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button