Uncategorized
वडापुरी येथे हिंदू संमेलनाचे आयोजन.

वडापुरी (ता इंदापूर) येथे उद्या रविवार दिनांक २२ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी ह भ प मनोहरमामा भोसले वृषाली पांडकर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बारामती जिल्हा कार्यवाह संतोष गाडे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी वडापुरी,अवसरी, भांडगाव, सुरवड,वकीलवस्ती, शेटफळ, काटी,रेडा वरकुटे खुर्द, पंधरवाडी व परिसरातील हिंदू माता भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



