Uncategorized

पक्ष्यांप्रती संवेदनशीलता बाळगा; नगराध्यक्ष भरत शहा यांचे इंदापूर शहर व परिसरातील नागरिकांना आवाहन.

इंदापूर नगर परिषद व वृक्षप्रेमी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या सहकार्याने इंदापूरयेथे २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष भरत शहा यांनी चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित केले. यावेळी बोलताना ते म्हणाले चिमण्या या परिसंस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून त्यांच्यामुळे कीटक नियंत्रण, पर्यावरण संतुलन राखले जाते. तसेच आधुनिक जीवनशैलीमुळे चिमण्यांची संख्या कमी होत असल्याची खंत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शहरातील व परिसरातील नागरिकांनी पक्षांसाठी पाणी ठेवणे, धान्य टाकणे, झाडे लावणे व पक्ष्यांप्रती संवेदनशीलता बाळगणे अशा चांगल्या सवयी आत्मसात करण्याचे आवाहन केले.

या वेळी पदाधिकारी व वृक्षप्रेमी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या सहकार्याने विविध उपक्रम उत्साहात पार पडले.या उपक्रमांमध्ये चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बसविणे, दाणा-पाणी ठेवण्याची व्यवस्था करणे तसेच वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.यावेळी इंदापूर नगर परिषदेचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button