Uncategorized

श्रीमंत ढोले राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषदेतील “सर्वोच्च” नेते.

विजय शिंदे

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. ७३ पैकी ५१ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि गटनेता म्हणून कोणाची नियुक्ती होणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये होती. परंतु जिल्हा परिषदेचे सदस्य व पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुणे जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी इंदापूर तालुक्यातील काटी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांची निवड करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंद पाकिटातून श्रीमंत ढोले यांच्या नावाची शिफारस केली.आमदार सुनील शेळके यांनी नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठकीत हे बंद पाकिट उघडले आणि गटनेतेपदी श्रीमंत ढोले यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

जिल्हा परिषद गटनेता हा आपल्या राजकीय पक्षाचे जिल्हा परिषदेतील सर्वोच्च प्रतिनिधी असतात. ते सभागृहात पक्षाची भूमिका मांडतात, सदस्यांमध्ये समन्वय साधतात आणि पक्षाच्या धोरणांनुसार विकासकामे व धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव पाडतात. ते पक्षाच्या अध्यक्षांशी व सदस्यांशी संवाद साधून तांत्रिक व कायदेशीर बाबींवर पक्षाचे मत ठरवतात.

श्रीमंत ढोले यांची गटनेते पदी निवड झाल्याचे समजताच इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी श्रीमंत ढोले यांचे अभिनंदन केले.

शक्यतो गटनेता हेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदी श्रीमंत ढोले यांना संधी मिळणार.? की नव्या चेहऱ्याला संधी देण्यात येणार याबाबत अजून पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button