Uncategorized

वडापुरी गणात राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना खबाले यांची प्रचारात आघाडी.

विजय शिंदे.

इंदापूर तालुक्यातील वडापुरी माळवाडी या जिल्हा परिषद मतदार संघात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी पक्ष व भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये होणाऱ्या थेट लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा परिषदेचे उमेदवार यशराज जगदाळे यांच्या बरोबर वडापुरी पंचायत समितीचे उमेदवार अर्चना अजित खबाले यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.प्रमुख कार्यकर्त्यांसोबत प्रत्येक घरापर्यंत, शेताच्या बांधावर जाऊनही मतदारांशी संवाद साधत आहेत.

वडापुरी गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना, रस्ते, शैक्षणिक सुविधा याकडे लक्ष दिले जाणार असल्याचे उमेदवार खबाले यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत खबाले यांनी विठ्ठलवाडी गावात शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी अजित खबाले व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button