Uncategorized

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन.

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूर शहरातील श्री हर्षवर्धन पाटील मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने अभिषेक करण्यात आला.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दीर्घायुष्य लाभो तसेच त्यांची राजकीय सामाजिक प्रगती होत जाओ, इंदापूर तालुक्याची सेवा करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती येवो ही प्रार्थना करण्यात आली.आली तसेच पाटील बंगला या ठिकाणी इंदापूर शहरातील कार्यकर्ते तसेच पाटील बंगला सोनाई नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.त्याचप्रमाणे वृक्ष संजीवनी परिवाराच्या वतीने व आय कॉलेज च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले ग्रामीण रुग्णालय इंदापूर या ठिकाणी रुग्णांना फळे केळी बिस्कीट पाणी वाटप करण्यात आली.

इंदापूर क्रिटिकेअर सेंटर का ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचा केक कापून श्री नारायणदास रामदास हायस्कूल च्या प्रांगणामध्ये सर्व कार्यकर्त्यांची व विद्यार्थ्यांची शुभेच्छा पर भाषणे झाली व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी इंदापूर शहरातील इंदापूर नगरपालिकेचे मा.उपनगराध्यक्ष कृष्णाजी ताटे, अलकाताई ताटे, माजी नगरसेवक शेखर पाटील गटनेते कैलास कदम, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक स्वप्निल सावंत, मनोज मोरे, धनंजय पाटील,मच्छिंद्र शेटे सर, प्राचार्य जीवन सरवदे, उपप्राचार्य दत्तात्रय गोळे प्रा.शिवाजी वीर, हिराचंद्र काळे,ललेंद्र शिंदे, मेघश्याम पाटील, संतोष देवकर, गोरख शिंदे,हमीद अत्तार,सायरा भाभी अत्तार, अमोल राऊत, यश शिंदे, अशोक खेडकर, दत्ता पांढरे, प्रकाश शिंदे, प्रमोद देवकर, निलेश शिंदे, कुणाल खडके, संदीप चव्हाण, दीपक पाटील, नितीन म्हस्के, राकेश फडतरे, अजिंक्य व्यवहारे, नाना देवकर, अविनाश कोतमिरे, अशोक अनपट, प्रशांत गिड्डे तसेच परिसरातील सर्व नागरिक कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button