ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात ७० लाख रुपयांचा निधी मंजूर; जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांची माहिती.
विजय शिंदे
भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष (दक्षिण) शेखर वढणे यांच्या मागणी पत्रावरून ग्रामविकास विभागाच्या वतीने इंदापूर तालुक्यात ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे शेखर वढणे यांनी इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली होती यानुसार सरडेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ते देशपांडे वस्ती या कामासाठी कामासाठी १० लक्ष, सरडेवाडी येथील चेतना कॉलेज ते देशपांडे वस्ती रस्ता १० लक्ष रुपये, गलांडवाडी २ भोंग वस्ती रस्ता १० लक्ष, गलांडवाडी २ अरुण भोंग ते रुक्मिणी भोंग वस्ती रस्ता करणे १० लक्ष, गलांडवाडी २ महात्मा फुले जिम ते बायपास रोड प्लेविग ब्लॉक १० लक्ष, निमगाव केतकी येथील जुने महादेव मंदिर सभा मंडप १० लक्ष असे एकूण ७० लक्ष रुपयांची विविध विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष शेखर वढणे म्हणाले इंदापूर तालुक्यातील विविध वाडीवस्तीना जोडणारे रस्ते सभा मंडप व इतर पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससाहेब, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे. भविष्यातही इंदापूर तालुक्यात विविध विकास कामे भारतीय जनता पक्षाच्या वतीने इंदापूर विधानसभेचे युवा नेतृत्व प्रवीण भैय्या माने व भाजपचे सर्व मंडल अध्यक्ष यांच्या माध्यमातून मार्गी लागतील. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले आहेत.



