Uncategorized

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत झगडेवाडी (ता: इंदापूर) ग्रामपंचायतीने विविध लोककल्याणकारी, पर्यावरणपूरक व विकासाभिमुख उपक्रम.

विजय शिंदे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत झगडेवाडी (ता: इंदापूर) ग्रामपंचायतीने विविध लोककल्याणकारी, पर्यावरणपूरक व विकासाभिमुख उपक्रम राबवून आदर्श ग्रामपंचायतीचा नमुना निर्माण केला आहे.

यासंदर्भात सरपंच अतुल झगडे व ग्रामपंचायत अधिकारी सतीश धायगुडे यांनी सदर अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.ग्रामपंचायतीकडून नागरिकांना विविध करांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात येत असून पारदर्शी कारभारावर भर देण्यात आला आहे. ग्रामपंचायत झगडेवाडी आय एस ओ मानांकन प्राप्त झाले असून गावातील शाळांना व ग्रामपंचायत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. महिला सक्षमीकरणासाठी महिला गट स्थापन करण्यात आले आहेत. महिलांसाठी प्रशिक्षण, उद्योग-व्यवसायासाठी कर्ज सुविधा मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन,गावातील पाणीपुरवठा, स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांनी वृक्ष लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्लास्टिकमुक्त झगडेवाडी करण्याचा संकल्प ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केला असल्याचे सरपंच झगडे म्हणाले. शैक्षणिक सुविधांमध्ये सर्व शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसवण्यात आले असून शाळांची रंगरंगोटी करण्यात आली आहे. लवकरच वाचनालय व अभ्यासिका सुरू होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button