Uncategorized

भाटनिमगाव येथे नवीन पोस्ट ऑफिस चे उद्घाटन..

भाटनिमगाव (ता इंदापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले आहे.इंदापूर शहरापासून ९ किमी अंतरावर असणाऱ्या गावात बँकिंग सुविधा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.पोस्ट ऑफिस सारख्या केंद्रीय खात्याच्या सर्व योजना सोयी सुविधा आजपासून लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांना उपलब्ध होतील.

हे ऑफिस सुरू होण्यासाठी बारामती विभागाचे अधिकारी सुदाम साबळे यांनी विशेष प्रयत्न केले या साठी बारामती विभागाचे विजयजी कदम यांनी विशेष सहकार्य केले.या वेळी माजी सरपंच मनोहर भोसले यांनी प्रास्ताविक केले, या वेळी भाटनिमगाव ग्रामपंचायत चे सरपंच अजित खबाले यांनी मुलीच्या नावे ५० हजार रुपयांची ठेव ठेऊन पहिले खाते उघडले.

या वेळी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन पंजाबराव गायकवाड, ग्रामसेवक निलेश यादव, उपसरपंच शकील शेख, ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत खबाले, विकास खबाले, अशोक कांबळे, बाळासाहेब पवार उपस्थित होते.

यावेळी उपस्थित कर्मचारी अधिकाऱ्यांनी पोस्ट बँके संदर्भात ग्रामस्थांना माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button