Uncategorized

इंदापूरकरांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा संधी द्या; मुकुंदशेठ शहा यांच्या इंदापूर शहरात होम टू होम भेटीगाठी.

विजय शिंदे

आगामी इंदापूर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, इंदापूर शहराच्या नगराध्यक्ष पदासाठी यंदा दोन्ही गटाकडून तगडे आव्हान उभे राहणार आहे.

इंदापूर नगर परिषदेमध्ये यंदा २० नगरसेवक व जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडून जाणार आहे, त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय वातावरण तापले आहे. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने जाहीर केली नसली तरी शहा समर्थक कार्यकर्त्यांनी भरत शहा यांची उमेदवारी जाहीर केली असून श्री नरसिंह नारायण मंदिरात अभिषेक करत प्रचारास सुरुवात केली आहे. माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक मुकुंदशेठ शहा, इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन व इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा व कार्यकर्त्यांनी इंदापूर शहरात होम टू होम जाऊन भरतशेठ शहा यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन मतदारांना केले आहे.

सन २०१७ च्या निवडणुकीत अंकिता शहा या काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर थेट जनतेतून निवडून आल्या होत्या. पाच वर्षे नगराध्यक्ष म्हणून अंकिता शहा यांनी काम केले असून आज संपूर्ण शहा कुटुंब इंदापूर शहरात केलेल्या विकास कामांची कार्यपुस्तिका घर टू घर देत पुन्हा एकदा आशीर्वाद देण्याचे आवाहन करत आहेत.

या कार्यपुस्तकेमध्ये माजी नगराध्यक्ष केलेल्या अंकिता शहा यांनी पाच वर्षे केलेल्या कामाची पूर्ण माहिती आहे. इंदापूरकरांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा भरतशेठ शहा यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन मुकुंदशेठ शहा यांनी इंदापूर शहरातील नागरिकांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button