Uncategorized

प्रभाग क्रमांक तीन मध्ये शेखर “भैय्या” .? पाटलांच्या होम टू होम मतदारांच्या गाठीभेटी.

विजय शिंदे

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण आता तापू लागले आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता असून, प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

इंदापूर शहरात प्रभाग क्रमांक तीन मधून माजी नगरसेवक शेखर पाटील हे (हर्षवर्धन पाटील गटाकडून) नगरपरिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी आरक्षण सोडत जाहीर होताच नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये होम टू होम मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

२००७ साली झालेल्या नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत वयाच्या २१ व्या वर्षी शेखर पाटील याच जुन्या प्रभागातून विजयी झाले होते. सर्वात तरुण नगरसेवक म्हणून त्यांची इंदापूरच्या नगर परिषदेत नोंद झाली आहे. पाच वर्ष नगरसेवक म्हणून काम करत असताना त्यांनी निवडून आलेल्या वार्डात अनेक सामाजिक लोकोपयोगी विकास कामे मार्गी लावली आहेत.

२०१२ ते २०१७ पर्यंत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले त्यानंतर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. गेली काही वर्षांपासून स्वर्गीय मंगेश बाबा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते इंदापूर शहर व परिसरात सामाजिक उपक्रम राबवत आहेत.

शेखर पाटील हे प्रभाग क्रमांक तीन मधून सर्वसाधारण जागेतून इच्छुक असून त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी ही सुरू केल्या आहेत. यापूर्वी दिवाळी सणानिमित्त फराळाचे आयोजन करत प्रभाग ३ व शहरातील सर्व नागरिकांना त्यांनी आमंत्रित केले होते.

यावेळी बोलताना शेखर पाटील म्हणाले प्रभाग तीन मध्ये मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याची संधी मिळाल्यास नागरिकांची अपूर्ण कामे व प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button