काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी भरघोस निधी व विकास कामाची तरतूद करणार; श्रीमंत ढोले.

विजय शिंदे
काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्रीमंत ढोले यांना मतदारांकडून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून मागील कालावधीत कामकरताना, जिल्हा परिषदेच्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा अनुभव आपल्या पाठीशी आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघासाठी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक विकासनिधी आणण्याचा ठाम संकल्प श्रीमंत ढोले यांनी व्यक्त केला. झोपडीतला माणूस हा केंद्रबिंदू मानून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विकासाचे राजकारण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.पुणे जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लाभल्याने जिल्हा नियोजन समिती तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून काटी-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहात आणणारा, सर्वांगीण विकास साधणारा आराखडा राष्ट्रवादी काँग्रेसकडे तयार असल्याचेही श्रीमंत ढोले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काटी-वडापुरी जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबातील मुले-मुली उच्चशिक्षित व्हावीत, यासाठी जय भवानी गड प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलात अद्यावत शिक्षण प्रणाली उभारण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत मतदारांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नसून,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याची ठोस व्यवस्था करण्यात आली आहे. एकूणच विकास, शेतकरी हित, शिक्षण आणि सक्षम नेतृत्व या चारही आघाड्यांवर ठोस भूमिका मांडणार्या श्रीमंत ढोले यांना मिळणारा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी निवडणुकीत काटी-लाखेवाडी मतदारसंघाचा निकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने झुकणार असल्याचे चित्र स्पष्ट करीत आहे.



