भाऊंकडून कृषी मंत्री मामांना “शुभेच्छा” म्हणाले शेतकर्यांना पहिली..

विजय शिंदे
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांना शुभेच्छा दिल्या असून शेतकऱ्यांसंदर्भात काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
साखर संकुल येथील ऊसाच्या आढावा बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री पाटील म्हणाले आमच्या इंदापूर तालुक्याला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या रूपाने कृषिमंत्रिपद मिळाले आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत,शेतकर्यांसाठी त्यांच्याकडून चांगल्या कामाच्या अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. राज्यातील १३५ लाख शेतकरी शेती व्यवसाय करतात. त्यांचे भवितव्य त्यांच्या हाती आले असून मी त्यांचे स्वागत करतो. त्यांनी शेतकर्यांना पहिली कर्जमाफी करावी. अवकाळी पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे होणार्या नुकसानीत मदत मिळावी. त्यासाठी शेतकर्यांसाठी चांगल्या पध्दतीने पीक विमा योजना राबवून पीक विमा नुकसान भरपाई दयावी अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली.
इंदापूर विधानसभेसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात सलग चार निवडणुका संघर्ष झाला आहे.२००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील विजयी झाले,तर २०१४,२०१९,२०२४ सलग तीन निवडणुकात दत्तात्रय भरणे विजयी झाले आहेत.



