सरडेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी गयाबाई अभिमान तोबरे.
विजय शिंदे
सरडेवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी गयाबाई अभिमान तोबरे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत सरडेवाडी येथे बुधवार दिनांक १३ रोजी सरपंच सुप्रिया कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सरडेवाडी येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
वैशाली शिद आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या जागी निवडणूक घेण्यात आली.
यावेळी गयाबाई तोबरे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जाधववर व सरपंच सुप्रिया कोळेकर यांनी तोबरे यांची निवड जाहीर केली.
यावेळी सिताराम जानकर, रवींद्र सरडे,सतीश चित्राव, आप्पा माने ,विजय शिद , मोहन सरडे, रघुनाथ जमदाडे, पोपट तोबरे विठ्ठल महाडिक, हनुमंत जमदाडे गोकुळ, कोकरे किशोर कडाळे,विष्णू कोळेकर, मल्हारी शिद, शहाजी तोबरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना तोबरे म्हणाल्या सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन गावातील विकास कामे मार्गी लावू. सर्वांना सोबत घेऊन ग्रामपंचायत मध्ये काम करू.



