देशासाठी तो काळा दिवस; इंदापूर तालुका भाजपच्या वतीने आणीबाणीचा निषेध.

विजय शिंदे
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून ५० वर्षापूर्वीच लोकशाहीची हत्या केली, देशासाठी तो काळा दिवस होता. काँग्रेसने अशाप्रकारे संविधानाची मोडतोड करण्याचे काम ५० वर्षांपूर्वीपासून केल्याचे टीकास्त्र इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आणीबाणीचा निषेध करण्यासाठी तसेच इंदापूर शहर व पूर्व मंडल मधील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक यावेळी इंदापूर येथील सिद्धेश्वर मंदिरात पार पडली यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बोलत होते.
या वेळी ज्येष्ठ नेते मारुती (आण्णा) वनवे,माऊली (काका) चवरे, पुणे जिल्ह्याचे महामंत्री आकाश कांबळे, इंदापूर पूर्व मंडल चे अध्यक्ष रामभाऊ आसबे, शहरचे अध्यक्ष किरण गाणबोटे, युवा नेते माऊली वाघमोडे, मयूर शिंदे, प्रवीण शाह, गणपत करे,आबासाहेब थोरात, जोतिराम कुर्डे,गणेश कोथमीरे,सुयोग सावंत, गणेश गवळी, लखन जगताप, तानाजी देशमुख उपस्थित होते.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवभारत निर्मितीसाठी कृतिशील असल्याचा विश्वास त्यांनी दिला.यावेळी इंदापूर तालुक्यातील पूर्व मंडल व शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.



