Uncategorized

प्रवीण माने यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरला.!! माने यांच्यासोबत कोण कोण जाणार.?

विजय शिंदे

इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून पहिल्यांदाच उभे राहिलेले व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने हे बुधवार २ जुलै रोजी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करण्यात असल्याची अधिकृत सूत्रांची माहिती आहे.

यापूर्वी प्रवीण माने यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी तसेच पुणे येथील सर्किट हाऊस येथे भेट घेत आगामी राजकीय खलबते केलेली आहेत.

प्रवीण माने यांच्या रूपाने इंदापूर तालुक्यात भाजपला ताकदवान, युवक नेता मिळण्याची चित्र स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच, भारतीय जनता पार्टीत प्रवीण माने व त्यांचे समर्थक पक्षप्रवेश करणार आहेत. प्रवीण माने यांच्या समर्थकांनी भाजप पक्षप्रवेशा आधीच माने यांना शुभेच्छा सुरू केल्या आहेत.

माने यांचे तालुका भर नेटवर्क मोठे असल्याने व त्यांच्या पाठीशी सोनाई परिवार खंबीर असल्याने तालुक्यात येणारी प्रत्येक निवडणूक ते पक्ष वाढीसाठी ताकतीने कार्यकर्त्यांच्या जीवावर लढू शकतात.

माने यांच्यासोबत कोण कोण जाणार.?

बुधवार २ जुलै रोजी प्रवीण माने हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली असून त्यांच्यासोबत तालुक्यातील आणखी कोण.? प्रवेश करणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष आहे.

प्रवीण माने यांच्यासोबत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील, इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य, इंदापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक, ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य व माजी पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button