Uncategorized

पंचायत समिती सभापती पदाकरिता ९ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत.

विजय शिंदे

पुणे, दि.८: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील इंदापूर पंचायत समिती सोबतच १२ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता, बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे.

सभापती पदाकरिता सोडत अडीच वर्ष कालावधीकरिता असणार आहे, अशी माहिती
जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते यांनी दिली आहे.
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button