Uncategorized

कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन.

विजय शिंदे

कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या इंदापूर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय येथील समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन भरतशेठ शहा, कर्मयोगी कारखान्याचे माजी संचालक मुकुंदशेठ शहा, गणेश महाजन, हर्षद सय्यद, श्रीनिवास माने प्रमोद राऊत व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय शंकरराव भाऊंच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन भाऊंना अभिवादन केले. स्वर्गीय शंकराव पाटील यांनी इंदापूर तालुक्यात विविध संस्थांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील तसेच इंदापूर तालुक्याच्या प्रगतीमध्ये माजी मंत्री स्वर्गीय शंकराव पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे मत आप्पासाहेब जगदाळे व भरतशेठ शहा यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button