Uncategorized

शहा– महादेव नगर ग्रामपंचायत येथे भारताच्या ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा.

विजय शिंदे

भारताच्या ७९व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत शहा महादेवनगर येथे मेजर बाबासाहेब निकम व गावातील विधवा भगिनींच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

यावेळी सरपंच दिलीप पाटील, ग्रामसेवक मराळ मॅडम, तलाठी देशमुख मॅडम, विष्णू पाटील अण्णा निकम, बलभीम गंगावणे, प्रकाश पाटील, दत्तात्रय पाटील महादेव लांडगे, तानाजी इजगुडे ,प्रशांत निंबाळकर, दादा भोई, ज्ञानदेव इजगुडे, संजय निकम शिवाजी शिंदे अशोक भोई, रोहिदास इजगुडे,वैजनाथ कोळी, संतोष निकम, तानाजी गंगावणे, मोमीन सर ,मोमीन मॅडम जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर, सुवर्णा शिंदे मॅडम, मोरे सर, लावंड मॅडम,अंगणवाडीच्या धाईजे मॅडम, व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रथमच सरपंच झालेल्या दिलीप पाटील यांनी ध्वजारोहणाचा मान गावातील भारतीय सेनेत सेवा बजावलेल्या सैनिकाला व गावातील विधवा बहिणीला दिला.

यावेळी सरपंच दिलीप पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या उपक्रमात सहभागी होऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्याला एक सायकल भेट दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button