Uncategorized

मारहाणीत फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टर निघण्याआधीच प्रमोशन? याला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’च म्हणावं.

विजय शिंदे

पावसाळी अधिवेशनादरम्यान विधीमंडळात रमी खेळत असतानाचा मंत्री कोकाटे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर कोकाटे यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. याच दरम्यान खासदार सुनील तटकरे लातुरात आले होते. येथे कार्यकर्ता संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी कोकाटे यांचा राजीनामा मागितला आणि तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले.

हा प्रकार पाहून संतापलेल्या सूरज चव्हाणने मागचा पुढचा कोणताही विचार न कराता कार्यकर्त्यांना घेऊन विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली होती. अगदी लाथाबुक्क्यांचा वर्षाव करण्यात आला. या घटनेनंतर पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सूरज चव्हाणची तत्काळ हकालपट्टी केली होती. ही घटना 20 जुलै रोजी घडली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजितदादांनी चव्हाणचा राजीनामा घेतला होता.

विशेष म्हणजे या सूरज चव्हाणला पक्षातून स्वतः अजित पवार यांनी निलंबित केलं होतं. मात्र महिनाभराच्या आतच सूरज चव्हाणचं पुनर्वसन करण्यात आलं. या घडामोडीवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. तर आता छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही. सूरज चव्हाणचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. अजित पवारांच्या भूमिकेस हे नक्कीच योग्य नाही, असे विजय घाडगे म्हणाले आहेत.

रोहित पवारांचा हल्लाबोल

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दांत टीका करत म्हटले आहे, “लातूरमधील गुंडगिरी प्रकरणी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्याचा अजितदादांचा निर्णय योग्य होता. पण महिन्याभरातच त्यांना प्रमोशन देणे याला काय म्हणायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.अजितदादांच्या पक्षात दोन गट आहेत. एक गट जाणीवपूर्वक त्यांची प्रतिमा खराब करत आहे.

‘शब्दाला पक्का’ ही अजितदादांची ओळख धुळीस मिळवण्यासाठी ही नियुक्ती झाली आहे. मारहाणीत फ्रॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टर निघण्याआधीच प्रमोशन? याला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’च म्हणावं लागेल!” रोहित पवार यांनी अजित पवार गटातील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवत पक्षाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘शब्दाला पक्का’ अजित पवारांना धक्का; विनाशकाले विपरीत बुद्धी, सूरज चव्हाणांच्या प्रमोशनवर रोहित पवार आक्रमक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button