पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यात सेवा पंधरवाडा होणार साजरा.

विजय शिंदे
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा केला जाणार आहे यानिमित्ताने इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यात रक्तदान शिबिर आयोजन, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवणे, नरेंद्र मोदी यांच्या जीवनपटावर आधारित प्रदर्शन भरवणे, आरोग्य शिबिराचे आयोजन, विचारवंत संवाद परिषद, मोदीजींच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाचे वितरण करणे, राज्यातील विशेष व्यक्तींचा सन्मान करणे, मोदी विकास मॅरेथॉनचे आयोजन या आणि अशा असंख्य कार्यक्रमाची या पंधरवड्यात रेलचेल असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती व भारतीय जनता पार्टी चे नेते प्रवीण माने यांनी दिली.
निमगाव केतकी येथील संत सावतामाळी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत प्रदेश कार्यकारणी सदस्य माऊली चवरे, मयूरसिंह पाटील, जिल्हा महामंत्री आकाश कांबळे, तालुका अध्यक्ष पूर्वमंडल राम आसबे, पश्चिम मंडल राजकुमार जठार, शहराध्यक्ष किरण गानबोटे,गोविंद देवकाते, धनंजय कामठे, नानासाहेब शेंडे, गजानन वाकसे, प्रविणकुमार शहा, मनोज पवार, सदानंद शिरदाळे, संतोष चव्हाण, समद सय्यद, सुजाताताई कुलकर्णी, प्रमिलाताई राखुंडे, माधुरीताई भराटे इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



