युनियन बँक ऑफ इंडिया इंदापूर शाखेच्या वतीने आर्थिक समावेशन योजनांसाठी विशेष अभियान.

विजय शिंदे
युनियन बँक ऑफ इंडिया इंदापूर शाखेच्या वतीने आर्थिक समावेशन योजनांसाठी विशेष अभियान अंतर्गत कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार (८ ऑगस्ट) रोजी सकाळी ११.३० वाजता गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथे महाप्रबंधक विपिन शुक्ला व इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिन खुडे, मुख्याधिकारी रमेश ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन क्षेत्रीय कार्यालय प्रमुख मयंक भारद्वाज तसेच इंदापूर शाखेचे प्रबंधक जयपाल तोरणे यांनी केले आहे.
सरकारकडून चालविल्या जाणार्या सर्व योजनांची माहिती शिबिरात दिली जाईल. ग्राहक बँकेने प्रदान केलेल्या सर्व सुविधांचा लाभ घेण्यास सक्षम असतील. शिबिरात, अटल पेन्शन, योजना, जीवन विमा, अपघात विमा, डिजिटल फसवणूक इत्यादी अनेक प्रकरणे तपशीलवार माहिती दिली जाणार आहे. यावेळी परिसरातील खातेदारांनी सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.



