Uncategorized
पळसदेव येथील स्वप्नील होरणे हा एम.डी. च्या पात्रता परीक्षेत उत्तीर्ण.

विजय शिंदे
पळसदेव येथील वृत्तपत्रविक्रेते सुनील होरणे यांचा मुलगा स्वप्नील होरणे हा एम.डी. (डॉक्टरेट इन आयुर्वेद) च्या पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झाला. श्रीगोंदा येथील स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरमधून त्याने बी.ए.एम.एस. (बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी) ही पदवी पूर्ण केली असून, आता पुढील उच्च शिक्षणासाठी एम.डी. (डॉक्टरेट इन आयुर्वेद) मध्ये प्रवेश घेण्याच्या पात्रतेची परीक्षा तो उत्तीर्ण झाला आहे.
शैक्षणिक वाटचालीत परिश्रम, चिकाटी आणि कुटुंबीयांच्या पाठबळामुळे यश मिळाल्याचे स्वप्नील याने सांगितले.
यावेळी तेजस रामचंद्र होरणे व रामचंद्र रंगनाथ होरणे यांनी स्वप्नील यांचे अभिनंदन केले आहे.



